Share

‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर

Published On: 

नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर टीका करत आहेत. अनेक मुद्द्यांवरून ते सरकारला घरचा आहेर देत आहेत. आता कोलमडत जात असलेली अर्थव्यवस्था आणि लडाख भागात चीनची सुरू असलेली घुसखोरी यांवरून स्वामी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. याप्रकरणी स्वामी यांनी एक ट्विट केले आहे.

सन २०१६ पासून कोलमडत चाललेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी कुणीही घेतलेली नाही. तसेच लडाख भागात चीनकडून होत असलेली घुसखोरी थांबवण्यात अपयश आल्याबाबत कुणीही जबाबदारी घेतली आहे. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना न करण्याबाबत जबाबदारी घेतली, असे सांगत मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नसल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या घडामोडी सूरू असून, अमेरिका आणि रशिया यांनी आपापसातील वितुष्ट मिटवले असून, लवकरच याची घोषणा केली जाईल. याला चीननेही समर्थन दिले असून, भारत आता एकटा पडण्याच्या स्थितीत आहे, असा दावा स्वामी यांनी केला आहे. दरम्यान, सातत्याने स्वामी यांच्याकडून टीका होत असताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र यावर मौन बाळगले आहे. तर स्वामींमुळे काँग्रेससह विरोधी पक्षांना मोदींवर हल्लाबोल करण्यासाठी आयते कोलीत मिळत असल्याचे दिसतेय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!