Share

कोहली करणार बॉलिंग? ; बीसीसीआयने प्रॅक्टिसचा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर चर्चा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाने शुक्रवारीपासून साऊथॅम्प्टनमध्ये सराव सुरु केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे होईल. टायटल सामन्याआधी टीम इंडियाने स्वत: ची तयारी करण्यासाठी इंट्रा-स्क्वॉड (त्यांच्याच खेळाडूंमधील) सामने खेळले. हा सामना 4 दिवसांचा आहे. एका संघाची कमान विराट कोहलीकडे सोपविण्यात आली आहे, तर दुसर्‍या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करत आहे. टीम इंडियाच्या या सरावाचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

बीसीसीआयने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.  याचं कारण म्हणजे कर्णधार कोहली या व्हिडीओमध्ये बॉलिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर कोहली आता बॉलिंग करणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. तर बीसीसीआयने तुमच्या पैकी किती जण योग्य सांगू शकतात असा प्रश्नार्थी कॅप्शन देऊन कोहलीच्या हातातील बॉल असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

१२ जूनला सरावादरम्यान कोहली बॉलिंग करतानाच्या अॅक्शनमध्ये दिसला त्यानंतर तो गोलंदाजीसाठी मैदानात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्या. विराट कोहली बॉलिंग करताना तर के एल राहुल बॅटिंग करताना दिसत आहे. 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. हा सामना ड्युक बॉलनं खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी टीम इंडिया जोरदार तयारी करताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!