Share

दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची लाखोंच्या संख्येनं होणारी वाढ पाहता भारतातील आरोग्य यंत्रणांपुढं आव्हान उभं राहिलं होतं. यंत्रणा कोलमडते की काय अशीच भीती प्रशासनालाही होती. पण, अखेर कहर माजवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून काही अंशी ओसरतानाचं चित्र दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन यासंबंधीची माहिती समोर येत आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झालेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात देशात कोरोनाच्या 80834 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 3303 जणांचा मृत्यू झाला. तर काल दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 1,32,062 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

एकूण आकडेवारी किती?
एकूण कोरोनाबाधित – 2,94,39,989
एकूण कोरोनामुक्त – 2,80,43,446
एकूण मृत्यू – 3,70,384
एकूण सक्रिय रुग्ण – 10,26,159

राज्यात कोरोनाचे 10697 नवे रुग्ण
राज्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या 10697 नव्या रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारपेक्षा ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसत आहे. यामुळे आजपर्यंत राज्यात करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या 58 लाख 98 हजार 550 इतकी झाली आहे. मात्र, त्याचवेळी यातले 56 लाख 31 हजार 767 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.48 टक्के इतका झाला आहे. तर 14910 रुग्णांना काल दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!