मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला येत्या १४ मे रोजी एक वर्ष पूर्ण होईल. त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तर, त्यांच्या मृत्यूमागे काही व्यक्तींचा हात असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवल्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत देखील केली गेली. मात्र आजही त्याच्या आठवणीत सुशांतचे कुटूंब आणि चाहते आठवण काढत आहेत. अशातच उषा नाडकर्णी यांनी देखील सुशांतच्या आठवनीना उजाळा देत मोठा दावा केला आहे.
एका मुलाखातीत उषा नाडकर्णी म्हणाल्या की, ‘सुशांत स्वप्न बघणारा मुलगा होता. अवघ्या 23-24 वर्षांचा तो मुलगा मोठी स्वप्न घेऊन आला होता. त्यानंतर मालिकांमधून तो सिनेमामध्ये गेला. तिथेही त्याला चांगले सिनेमे मिळाले. त्याला जे हवं ते सगळं मिळत होतं. त्याचे त्यानंतर काय करायचं याचे प्लॅनही होते. असं असणारा सुशांत आत्महत्या करूच शकत नाही. मला खात्री वाटते की त्याला मारलं गेलं असेल,’ असे थेट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. सुशांत गेल्याची बातमी आल्यानंतर उषा नाडकर्णी यांना शोक अनावर झाला असल्याचही त्या म्हणाल्या.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी बऱ्याच बॉलीवूड कलाकारांची नावे समोर आली. या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव समोर आलं होतं. त्यांनतर रिया चक्रवर्तीला काही दिवस कोठडी देखील सुनावली होती. त्यानंतर तिची जामीनावर सुटका करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

