🕒 1 min read
बीड: सध्या ऊर्जामंत्री नितीन राऊत मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी बीड जिल्ह्याला त्यांनी भेट दिली. जिल्ह्यात वाड्या वस्त्यावर ट्रान्सफॉर्मर द्यावेत. लोकांना विजेची सुविधा उपलब्ध करून द्या आणि वीज बिलाची अंदाजे आकारणी करू नका. मीटर रीडिंग प्रमाणे बिले द्यावीत. लोकांच्या तक्रारी येता कामा नयेत, अशा शब्दात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
माजी मंत्री अशोक पाटील यांच्या केज येथील शिवनेरी बंगल्यावर राऊत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ऊर्जामंत्री राऊत म्हणाले की, लोकांना वीज द्या, सुविधा द्या लोक वीज बील भरतात त्यांना सवय लावा आणि अनेकांच्या तक्रारी आहेत. त्यांची दखल घेऊन तात्काळ प्रश्न मार्गी लावा अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ते जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांना भेटले.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक गावात नविन ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेजचे नवीन वस्त्यांवर ट्रान्सफॉर्मर द्यावेत, अशा मागण्यांचे निवेदन दिले. यावर राऊत यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन ही कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यासह नगराध्यक्ष आदित्य पाटील यांनी केज शहरात मागील काही महिन्यात वाढीव बील येत असून हे बील कमी करावेत, अशी मागणी आदित्य पाटील यांनी केली. यावर मंत्री राऊत यांनी तत्काळ शहरातील बिलांची फेरतपासणी करा, असे आदेश उप-अभियंता राजेश आंबेकर यांना दिले. या आदेशामुळे सर्वसामान्य लोकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
