Share

भारत सेमी फायनलमध्ये पोहचेल? असं ठरू शकतं गणित

Published On: 

दुबई: टी-20 वर्ल्ड कपमध्ये काल झालेल्या सामन्यातभारताची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर आता न्यूझीलंडनेही भारताचा 8 विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 112 रनचं आव्हान न्यूझीलंडने 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. यामुळे भारताचा नेट रन रेट अत्यंत खराब झाला आहे. आणि त्यामुळेच आता सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला आता स्वत:सोबतच दुसऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.

दुसऱ्या ग्रुपच्या पॉईंट्स टेबलमध्येभारतीय संघ 6 टीममध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान आणि नामिबियाची टीमही भारताच्या पुढे आहे, तर स्कॉटलंड भारताच्या मागे शेवटच्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानने त्यांचे तीन पैकी तीन सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांचं सेमी फायनलला पोहोचणं जवळपास निश्चित झालं आहे. दुसऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानची टीम पहिल्या क्रमांकावर आहे.

तर अफगाणिस्तानने 3 पैकी 2 सामने जिंकल्यामुळे ते 4 पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. न्यूझीलंड आणि नामिबियाने 2 पैकी 1 मॅच जिंकल्या आहेत. पण न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला असल्यामुळे ते तिसऱ्या आणि नामबिया चौथ्या क्रमांकावर आहे. भारत आणि स्कॉटलंडने त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही मॅच गमावल्या आहेत. भारताचा नेट रनरेट -1.609 आहे. त्यामुळे भारताने उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आणि न्यूझीलंडचा अफगाणिस्तानविरुद्ध पराभव झाला, तरच नेट रन रेटच्या माध्यमातून टीम इंडिया सेमी फायनलला पोहोचू शकते.

दरम्यान 3 नोव्हेंबररोजी भारत विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना होणार आहे. तर 5 नोव्हेंबररोजी भारत विरुद्ध स्कॉटलंड आणि
8 नोव्हेंबररोजी भारत विरुद्ध नामिबिया असा सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!