अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजपकडून हे सरकार पडणार असल्याच्या टीका वारंवार केल्या जात आहे. यावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यावरुनच आता काँग्रेस नेते आणि पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला टोला लगावला आहे.
काहीजण महाविकास आघाडी सरकार कधी जातेय यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. महाविकास आघाडी सरकार कधी जाणार यासाठी काही जण रोज स्वप्न पाहतात. स्वप्नात ते बडबडत असतील. मात्र, महाविकास आघाडी सरकार दोन वर्ष चाललं आहे. पुढील तीन वर्ष देखील ती चालू राहणार आहे. आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून पुन्हा निवडून येऊ, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारचं काम चागलं सुरु आहे त्याला उद्धव ठाकरेंचं व्यक्तिमत्व कारणीभूत आहे. उद्धव ठाकरे सर्वांना समजावून घेतात, सगळ्यांना सोबत घेऊन काम करतात. आमचं सरकार आलं, सात जणांचा शपथविधी झाला तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय कर्जमुक्ती मिळावी यासाठी काम केलं. त्या अगोदर शेतकऱ्यांना अनेक अर्ज भरावे लागत होते, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
कोरोनाचं संकट सर्वात चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रानं हाताळलं. उद्धव ठाकरेंचा सर्वात पहिला क्रमांक कोरोना हाताळण्यात लागला. आम्ही कोणतेही आकडे लपवले नाहीत. मृतांचे आकडे लपवण्याचा प्रयत्न करणारे उघडे पडले, ते गंगा नदीत दिसून आले. कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कुणाच्या तरी इशाऱ्यावर बोलण्याची मालिकांना सवय असेल, तुमचं खिशात ठेवून दाखवाच ‘हे’ आव्हान स्वीकारलं’
- फरार परमबीर सिंह बेल्जियममध्ये आहेत; संजय निरुपम यांचा दावा
- पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच; निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे सुप्रिया सुळेंचे आदेश
- पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विनायक मेटेंची एन्ट्री; स्वबळावर की भाजपसोबत?
- त्या मुलाकडे काहीच सापडलं नाही मग त्याला एवढे दिवस अटक का?; आर्यन खान प्रकरणी सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया


