Share

न्यूझीलंडचा भारतावर ८ गड्यांनी विजय; भारताचा लाजिरवाणा पराभव

Published On: 

दुबई: टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर काल झालेल्या सामन्यात भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले.

दरम्यान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंड विजयाकडे सहज वाटचाल करत असताना मिशेल बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. त्यानंतर विल्यमसनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत १५व्या षटकात न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला.दरम्यान सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धूळखात झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!