दुबई: टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर काल झालेल्या सामन्यात भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.
हे निराशादायक आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर आम्ही धाडसी नव्हतो. आम्ही मैदानात उतरलो तेव्हा आमची देहबोली कमकुवत होती, तर न्यूझीलंड संघाची तीव्रता आणि देहबोली चांगली होती. जेव्हा आम्ही पहिल्या डावात धावा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही संधी साधल्या आणि विकेट गमावल्या. यामुळे आम्ही शॉटसाठी जावे की नाही याबद्दल संकोच करत होतो. भारताकडून खेळताना खूप अपेक्षा असतात. लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि भारतासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाने ते स्वीकारले पाहिजे आणि त्याचा सामना केला पाहिजे. आम्ही या दोन सामन्यांमध्ये तसे केले नाही आणि म्हणूनच आम्ही जिंकलो नाही. अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने दिली आहे.
आम्हाला दबावापासून दूर राहावे लागेल आणि आमची प्रक्रिया सुरू ठेवावी लागेल आणि सकारात्मक क्रिकेट खेळावे लागेल. असे तो म्हणाला आहे. दरम्यान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अधिकारी नोकरी करत असताना मंत्री जेलची धमकी देतोय’, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची नाराजी
- ‘महाविकास’ आघाडी सरकार म्हणजे तीन बायकांचा संसार; ओवेसींचा घणाघात!
- दिवाळीनिमित्त औरंगाबादेतील बाजारपेठेत तुफान गर्दी; या गर्दीत भेटू शकतो ‘कोरोना’!
- सरकार कधी जातंय यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले- बाळासाहेब थोरात
- ‘शेतकऱ्यांना बळजबरीने सीमेवरून हटवले तर सरकारी कार्यालयात…’, राकेश टिकैत यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

