🕒 1 min read
औरंगाबाद : बालगोपाळांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता दिवाळी सण जवळ येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळत आहे. कोरोना कमी झाला असला तरीही गेल्या काही दिवसातील रुग्णांचा अभ्यास केला असता गर्दीतून संसर्ग झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा, त्याचबरोबर गर्दीत जाणे टाळा असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
दसरा संपला की दिवाळीचे वेध सुरू होतात. आणि सगळेच दिवाळी सण जल्लोषात साजरा करण्यासाठी तयारी करण्यास सुरुवात करतात. दिव्यांचा आणि चैतन्याचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या निमित्ताने सोने-चांदी, कापड, इलेक्ट्रॉनिक अशा विविध खरेदीसाठी नागरिकांची गेल्या काही दिवसांपासून मोठी लगबग सुरू आहे. त्यात सुट्टी असल्याने शनिवार-रविवार बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत.
गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट, सिटी चौक, रंगारगल्ली, कुंभारवाडा तसेच शहर परिसरातील बाजारपेठ, मॉलमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी उसळली आहे. मात्र याच गर्दीतून कोरोनाचाही फैलाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करत समाजात वावरण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात येत आहे.
लसीकरणास अल्प प्रतिसाद
लसींची संख्या मुबलक असली तरीही लसीकरणास अल्प प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल मोहीम राबवण्यात आली. मात्र अजूनही शहरात निम्म्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसात लसीकरणाची गती कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनपाकडून विविध स्वरूपाच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सणासुदीच्या काळात लसीकरण करून घ्यावे. असे आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भावना गवळींना ईडीची नोटीस मिळताच चिकनगुनिया झाला, इतका हा गंभीर रोग’, भातखळकरांची खोचक टीका
- उर्मिला मातोंडकरला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर दिली माहिती
- ‘…त्यांनी ठाकरे सरकारचे बाप असलेल्या शरद पवारांना दाऊदसोबत कोण बसलं होतं?’, हे विचारावं
- देशभरात काँग्रेस पक्षाला सोडून कोणतीही आघाडी होऊ शकत नाही; संजय राऊत यांचे मत
- ‘दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार’, किरीट सोमय्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

