Share

‘शेतकऱ्यांना बळजबरीने सीमेवरून हटवले तर सरकारी कार्यालयात…’, राकेश टिकैत यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. ‘जेसीबीच्या सहाय्याने प्रशासन येथील तंबू हटवण्याचा प्रयत्न करत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. जर त्यांनी तसे केले तर शेतकरी पोलीस ठाण्यात तंबू लावतील’ असे ते म्हणालेत.

दिल्लीच्या सीमेवरून शेतकऱ्यांना हटवण्याचे काम केंद्र सरकराने सुरू केलं आहे. याचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली आहे. जबरदस्तीने शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारी कार्यालयांचे मंडईत रुपांतर करू, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर शेतकरी नेते आणि युनायटेड किसान मोर्चाने आपल्या बाजूने रास्ता रोको केला नसल्याचे सातत्याने सांगितले सांगत आहेत. उलट पोलीस प्रशासनाने (दिल्ली पोलीस) बॅरिकेड्स लावून हे केले आहे, असं स्पष्टीकरण शेतकरी नेत्यांनी दिलंय. दिल्ली पोलिसांनी गुरूवारी रात्रीपासून गाझीपूर आणि टीकरी सीमेवरील बॅरीकेड्स हटवणं सुरू केलं आहे. ज्या ठिकाणी शेतकरी प्रदीर्घ काळापासून आंदोलन करत आहेत. जवळपास वर्षभरापासून हे मार्ग बंदच आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!