नांदेड: राज्यातील महावीकस आघाडी सरकारने हाताने घालवलेले मराठा आरक्षण तसेच त्यांनी मराठा समाजाची केलेली धूळफेक या मुद्द्यावरून नांदेडचा ‘करंट’ घेऊन आगामी अधिवेशनात सरकारला चांगलाच ‘शॉक’ देणार असे वक्तव्य आ. आशीष शेलार यांनी केले आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या एक कार्यक्रमात शुक्रवारी शेलार बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी राज्यात सध्या चांगलेच वातावरण तापले आहे, तसेच अनेक नेते या मुद्द्यावरून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याचे देखील काम करत आहेत.
महाविकास आघाडीच्या निष्क्रिय कारभारामुळे तसेच मराठा उपसमितीचे अध्यक्ष ना.अशोकराव चव्हाण यांच्या मनमानी कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयात योग्य पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास अपयशी ठरलेले महाविकास आघाडीचे नेते या बाबत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. आता महावीकस आघाडी सरकार समाजाच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यालयाने महाविकास आघाडी सरकारने केलेल्या चुका सर्वसामान्यांना सांगण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडे ही जबाबदारी दिली आहे.
नांदेड व बीड जिल्ह्याची जबाबदारी ॲड.आशिष शेलार यांच्याकडे दिल्यानंतर ते गुरूवारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी शुक्रवारी दि.४ जून रोजी मराठा समाजातील प्रमुख नेत्यांसमवेत शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन केले होते. त्यांनी या बैठकीत समाजातील विविध संघटना तसेच प्रतिष्ठितांची मते जाणून घेतली. यावेळी समाजातील कांही प्रमुखांनी महाविकास आघाडी सरकार आरक्षण देण्याऐवजी धुळफेक करीत असल्याचा आरोप केला. नांदेडची ही उर्जा ‘करंट ‘ घेऊन आगामी अधिवेशनात सरकारला ‘शॉक’ दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे वक्तव्य मराठा समाजातील प्रमुख घटकांशी थेट संवाद साधतांना ॲड. आशिष शेलार यांनी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- मेटेंचे भाषण सुरू असताना पाऊस आला, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेचा दाखला देत म्हणाले..
- ‘ही तर सुरुवात आहे, शेवट काय आहे तो नंतर सांगू’, आ.मेटेंचा इशारा
- उद्धवा, अजब तुझे सरकार! कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण तर विनापरवानगी आ.मेटेंच्या मोर्चाला पोलिसांचे सरंक्षण
- आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
