Share

आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Published On: 

बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आज बीडमधून मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याची संपूर्ण तयारी करण्यात आली असून थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. यावर ‘बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला तरी मोर्चा निघणारच’ असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भूमिका घेत आहोत. परंतु, मोर्चेकऱ्यांची प्रशासनाने अडवणूक करू नये. कोरोनामुळे मोर्चेकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि फिजिकल डिस्टन्सिंगची खबरदारी घेणार आहोत असा दावा मेटे यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात असे काहीही घडत नसल्याचे चित्र सध्या बीड शहरात दिसत आहेत.

शेकडोंच्या संख्येने मेटे समर्थकांनी गर्दी केली आहे. यात सोशल डिस्टन्सिंगचा पार धुव्वा उडालाय. बहुतांश नागरिकांनी मास्कही लावलेला नाहीये. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने नियमांची पायमल्ली होत आहे. खुद्द मेटेंच्या भोवती गर्दी जमा झालीये.

दरम्यान, मोर्चातील पुढची रुपरेषा ठरवून राज्यभर आंदोलनाची दिशा करणार जाहीर असल्याचे मेटेंनी सांगितलेय. राज्यभरातून आलेल्या संघटनांच्या प्रतिनिधीसोंबत त्यांनी बैठक घेतली. विनायक मेटे आज राज्याच्या आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा सुरू झाला आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मोर्चेकऱ्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बीड शहरात अनेक ठिकाणी भगव्या पताका लावण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!