बीड : कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील किनगावचे (ता.गेवराई) शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला होता. लॉकडाऊनचे नियम मोडल्याने अधिकार नसतानाही पोलिसांनी अनेकांवर काठी उचलली. मात्र, आज बीड शहरात हीच पोलिसांची काठी जादूच्या छडीप्रमाणे गायब झाली की काय असे वाटत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा सुरू झाला आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आमदार विनायक मेटे यांनी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
हा मोर्चा कोरोनाच्या संकटामुळे उद्या न काढता पुढे ढकलावा, अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली होती. मात्र, मेटेंनी सर्व विनंत्या फेटाळत मोर्चा काढला आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या नियमांचे पालन होईल अशी ग्वाही मेटे यांनी दिली होती. परंतू प्रत्यक्षात मात्र सर्व नियम पायदळी तुडवत मोर्चा सुरू असल्याचे दिसत आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. नियमांचे पालन न केल्याने पोलिसांनी अनेकांना बेदम मारले. पण विनापरवानगी निघालेल्या मेटेंच्या मोर्चाला मात्र पोलीस सरंक्षण देत आहेत. हे चुकीचे आहे. पोलिसांनी मेटेंवर मोर्चा काढण्यापूर्वीच कारवाई करायला हवी होती. या मोर्चामुळे कोरोनाचा उद्रेक पुन्हा होऊ शकतो अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याकडे विशेष लक्ष देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आमदार मेटेंवर कारवाई करावी अशी मागणी होतेय.
मोर्चाच्या सरंक्षणासाठी असा आहे बंदोबस्त
या मोर्चाच्या अनुषंगाने शुक्रवारपासूनच जिल्हा पोलिसांचा चौकाचौकात बंदोबस्त लावला. ३ डीवायएसपी, पोलिस निरीक्षक, सपोनि, कर्मचारी, होमगार्ड, क्यूआरटी, एसआरपी, दंगल नियंत्रण पथक तैनात आहेत. अपर पोलिस अधीक्षक हे बंदोबस्त प्रमुख आहेत. तर, व्हिडीओ कॅमेरे, ३ ड्रोन कॅमेरे, रस्त्यावरील सीसीटीव्ही यांची मोर्चावर नजर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आ.मेटेंची ग्वाही फक्त नावालाच, मोर्चाच्या सुरुवातीलाच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- ‘गंगेतील मृतदेहांची चर्चा झाली, पण बीडच्या २२ मृतदेहांच्या विटंबनेवर शांत का?’
- ‘पोलिसांनी कायदा, सुव्यवस्था ढासळणार नाही याकडे लक्ष द्यावे’, बंदी असतानाही मोर्चा काढणाऱ्या आ.मेटेंचे आवाहन
- महाराष्ट्र अनलॉक! जाणून घ्या तुमचा जिल्हा कधी अनलॉक होणार आणि काय सुरू होणार?
- राज्य सरकारकडून अधिकृत नियमावली जाहीर, सोमवारपासून महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
