Share

मेटेंचे भाषण सुरू असताना पाऊस आला, शरद पवारांच्या ‘त्या’ सभेचा दाखला देत म्हणाले..

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीडमधील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाचे रुपांतर एका जाहीर सभेत झाले. यावेळी शिवसंग्रामचे संस्थापक तथा विधानपरिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, त्यांचे भाषण सुरू असताना तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सभेला बसलेल्या लोकांनी हालचाल सुरू केली.

यावर मेटे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या साताऱ्यातील त्या सभेची आठवण करून दिली. मेटे म्हणाले, ‘पावसाने काही भोकं पडत नाही. महाराष्ट्राचा इतिहास आहे की पाऊस पडला की चांगलं घडतं. हा शुभसंकेत आहे. लोकांनी हा शुभसंकेत २०१९ ला अनुभवलाय. एका पावसात भिजल्याने सरकार आणलं. त्यामुळे आपण पावसात भिजलो तर आरक्षण मिळणार नाही का? आणि नाही मिळालं तर यांना (महाविकास आघाडी सरकार) घालवल्याशिवाय राहणारेत का? एवढ्या मोठ्या कोरोनाला आपण घाबरत नाही, मग इतक्याश्या पावसाला आपण घाबरणारेत का?’ असा सवाल मेटे यांनी उपस्थितांना करत सभेत खिळवून ठेवले.

अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही
मराठा समाजाच्या मागण्या पाच जुलैपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही असा इशारा शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने EWS आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, असा घणाघात मेटे यांनी केलाय. याबरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भातही राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावेत. अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तयार व्हा, इशा इशाराच मेटे यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!