Share

‘ही तर सुरुवात आहे, शेवट काय आहे तो नंतर सांगू’, आ.मेटेंचा इशारा

Published On: 

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा सुरू झाला आहे. बीडमध्ये निघणाऱ्या या मराठा क्रांती मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी आमदार विनायक मेटे यांनी जय्यत तयारी केली आहे.

मोर्चाला प्रारंभ झाल्यानंतर मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजावरील अन्याय सरकारने दूर करावा. अन्यथा मराठा समाजाला सरकारचं भविष्य ठरवावं लागेल. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा राज्यात गेल्या वर्षीप्रमाणे मराठे मोर्चे सुरु होतील.

यावेळी त्यांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. मराठा समाजावर अन्याय होत आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाचे भविष्य अंधकारमय झाले आहे. आम्हाला पुढची दिशा सापडत नाही. त्यामुळे आता सरकारने निर्णय घेतला नाही तर मराठा समाजाला सरकारच्या भविष्याविषयी विचार करावा लागेल. ही तर सुरुवात आहे. शेवट काय आहे, तो नंतर सांगू, असेही मेटे म्हणाले.

गर्दी जमल्याने काळजी व्यक्त
बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येत आंदोलकांची गर्दी झालीय. याच चौकातून हा मोर्चा सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग आहे. कोरोनाचे संकट टळलं नसताना, परिस्थिती अद्याप नियंत्रणात नसताना, अशी गर्दी जमल्यानं काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!