Share

मुंबईविरुद्धच्या आजच्या सामन्यात फाफ डुप्सेसी खेळणार की नाही? मोठी अपडेट समोर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित सामने रविवार 19 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. या हंगामाचा दुसरा टप्पा आज संध्याकाळी सुरू होईल. आयपीएल 14 च्या भाग दोनच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे.

याच मॅचबाबत चेन्नई संघातून मोठी अपडेट आली आहे. नुकताच आपला क्वारन्टाईन कालावधी पूर्ण केलेल्या डुप्लेसिसबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डुप्लेसिसला झालेल्या दुखापतीमुळे त्याची मुंबई विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी होती. आणि त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळणार याबाबत चर्चा होत होती. आता डुप्लेसिस फिट आहे परंतु मॅच सुरु व्हायच्या अगोदर त्याच्या खेळण्याबाबत निर्णय केला जाईल, असं काशी विश्वनाथन यांनी सांगितलं. तर चेन्ननईकडून आज सॅम करन खेळणार नाहीय.

ड्यू प्लेसिस CSK च्या सराव सत्रात चांगला खेळताना दिसला. पण, मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय सामन्यापूर्वी काही वेळ अगोदर घेतला जाईल. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी अशी माहिती दिली आहे. ड्यू प्लेसिसने आपला क्वारन्टाईन पिरियड संपल्यानंतर सरावही केला आहे. सराव सत्रात त्याला त्रास झाला नाही. पण, सामन्यापूर्वी त्याच्या खेळण्याबाबत आम्ही निर्णय घेऊ.’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ड्यू प्लेसिसला आयपीएलपूर्वी दुखापत झाल्याने त्याची आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात खेळण्यावर साशंकता होती. मात्र आता तो पहिल्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबतचा निर्णय सामन्यापूर्वी काही वेळ अगोदर घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!