Share

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यात सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजपने राज्यसरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून नुकीतीच भाजपकडून अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. यामुळे भाजप  – महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे असं दिसून येत आहे.

दरम्यान, ओबीसी राजकीय आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी इम्पेरिकल डेटा मिळवणे गरजेचे आहे. राज्य सरकारने यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या 23 सप्टेंबरला याप्रकरणी सुनावणी होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मुंबईत ते बोलत होते.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यानुसार ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला हवे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा मिळवण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेले आहे. ओबीसी समाजाची जनगणना करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांना यासंदर्भात आठवण करु दिल्याची माहिती मंत्री भुजबळ यांनी दिली.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी 23 सप्टेंबरपर्यंत वेळ मागितला आहे. येत्या 23 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कपिल सिब्बल महाराष्ट्र सरकारची बाजू मांडतील. कोर्टाने केंद्र सरकारला इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले तर राजकीय आरक्षणाचा मार्ग तातडीने मोकळा होईल, असे मंत्री भुजबळ म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!