Share

मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली

Published On: 

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट उघडकीस आणला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २ पाकिस्तानी नागरिकांसह एकूण सहा दहशतवाद्यांना यांसदर्भात अटक केली आहे. या अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर मुंबईतील लोकल ट्रेन होत्या अशी माहिती समोर आली आहे. गुप्तचर विभागानेही तशी माहिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वेस्थानकावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे सांगितले जात आहे. दरम्यान, या संशयित दहशतवाद्यांना नुकतंच दिल्लीमधील एका न्यायाधिशांच्या घरीच त्यांच्यासमोर हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंगाली भाषा बोलणारे १६ आणि पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले काही तरुण पश्चिम बंगालमध्ये लपले आहेत. तसेच आपण या दहशतवादी कृत्यामध्ये पैशांसाठी नाही तर जिहादसाठी सहभागी झालो आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंगला गेल्याची माहिती या दोघांनी दिलीय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!