🕒 1 min read
नवी दिल्ली- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच अॅम्फोटेरिसिन बी, टोसीलिझुमॅबला 31 डिसेंबरपर्यंत जीएसटी लागू होणार नाही.वस्तू आणि सेवा कर परिषदेची 45 वी बैठक काल सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लखनौ इथं प्रत्यक्ष उपस्थितीत झाली; त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत, या बैठकीतील निर्णयांची माहिती सीतारामन यांनी दिली.
कर्करोगावरील उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवरील वस्तू आणि सेवा कर 12 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 प्रकारच्या औषधांवर जीएसटी माफ करण्यात आला आहे. तसंच दिव्यांगांसाठीच्या वाहनांवरचा जी एस टी कमी करून 5 टक्के करण्याचा निर्णय GST परिषदेनं घेतला आहे. स्विग्गी, झोमॅटो अशा ऑनलाईन फुड डिलिव्हरी कंपनीवरील जीएसटी लागू करण्याचा विषय मंत्रिगटाकडे पाठविण्यात आला आहे. मंत्रिगटाच्या शिफारशीनंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रिगटाला दोन महिन्यांची वेळ देण्यात आलेली आहे.
दरम्यान, पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश तूर्तास वस्तू आणि सेवा कराअंतर्गत न करण्याचा निर्णय काल वस्तू आणि सेवा कर परिषदेनं घेतला अनेक सदस्य पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश वस्तू आणि सेवा कराअंतर्गत करण्याबाबत सहमत नाहीत, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
- ‘मुंबई इंडियन्स नाही तर ‘या’ संघाकडे आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी’
- न्यूझीलंडनंतर आता ‘हा’ संघही रद्द करू शकतो पाकिस्तान दौरा
- बीसीसीआय विराटला देणार आणखी एक मोठा धक्का; सर्वात मोठ्या ‘शत्रू’ची संघात होणार एंट्री
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
