मुंबई : भाजपाचा मोदी हाच चेहरा आहे, बाकी सारे मुखवटे आहेत, मोदीचा चेहरा नसेल तर महानगरपालिका निवडणुकीतही भाजप पराभूत होईल. मोदी-नड्डा या जोडीने गुजरातमधील सारी किडकी झाडे मुळासकट उपटून टाकली. अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.
भाजपाने गुजरातमधील मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्रीमंडळ बदलले. रुपाणी यांच्यामागे आमित शहांचा हात होता. मात्र मोदींना आपल्या मनातील गोष्टी सत्यात उतरवण्यासाठी नड्डांची साथ लाभली. यातून या जोडीने एक जोरदार राजकीय संदेश आपल्या पक्षाला दिला आहे. मावळते उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे स्वत:ला ‘हेवीवेट’ समजत होते. मात्र त्यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आला. गुजरातमधील पाटीदार समाज अस्वस्थ होता. मात्र होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत त्याचा फटका भाजपाला बसेल, याचा अंदाज आल्यानेच संपूर्ण मंत्रिमंडळाला मोदींनी घरी पाठविले.
नव्या मंत्री मंडळात १४ मंत्री पाटीदार व ओबीसी समाजाचे आहेत. २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी-नड्डांनी बदलले. आता या जोडीचे मध्यप्रदेश, हिमाचल व हरयाणाच्या मुख्यमंत्र्यावर बारीक लक्ष आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
- ‘मुंबई इंडियन्स नाही तर ‘या’ संघाकडे आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी’
- न्यूझीलंडनंतर आता ‘हा’ संघही रद्द करू शकतो पाकिस्तान दौरा
- बीसीसीआय विराटला देणार आणखी एक मोठा धक्का; सर्वात मोठ्या ‘शत्रू’ची संघात होणार एंट्री
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली

