मुंबई – मुंबईत नुकत्याच करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणात सुमारे 86.64 शतांश टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकार शक्ती विकसित झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र विषाणूचा नवीन प्रकार आल्यास या रोगाची लागण होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा बृह्न्मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नसलेल्या 79 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये देखील प्रतिकार शक्ती निर्माण झाली असल्याचं या सर्वेक्षणात स्पष्ट झालं आहे.
सेरो सर्वेक्षणात रक्त नमुन्यांची चाचणी करून प्रतिपिंडे (करोनाच्या अॅण्टीबॉडीज् ) शोधली जातात. मुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण करण्यात आले, तर एकदा लहान मुलांचे विशेष सेरो सर्वेक्षण करण्यात आले. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर १२ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ८,६७४ नागरिकांमध्ये पूर्वसंमतीने पाचवे सेरो सर्वेक्षण करण्यात आले.
महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय यांच्या वतीने आणि एटीई चंद्रा फाऊंडेशन व आयडीएफसी इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात आला. महापालिकेचे दवाखाने आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे येणाऱ्या रुग्णांचा समावेश या सर्वेक्षणात करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे स्पष्टीकरण
- ‘मुंबई इंडियन्स नाही तर ‘या’ संघाकडे आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी’
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

