Share

भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना रद्द होणार ? बीसीसीआयने साधला खेळाडूंशी संवाद, कारण…

Published On: 

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने यजमान इंग्लंडचा 157 धावांच्या फरकाने पराभव केला. भारताने इंग्लंडकडून लीड्स कसोटीचा बदला घेतला आणि या सामन्यातील विजयासह इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी घेतली.

ही कसोटी मालिका बोबरीत करण्यासाठी इंग्लंडचा संघ रणनीती आखत असून भारताला हा सामना अनिर्णित अथवा जिंकून ३-१ च्या फरकाने इंग्लंडला पराभूत करण्याची संधी आहे. मात्र, या पाचव्या सामन्याबाबत अनिश्चिततेचे ढग अधिक गडद होत आहेत. गेले दोन वर्षे कोरोना महामारीने जगभरात थैमान घातले असून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. चौथा सामना सुरु असतानाच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना १० सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला आहे. मात्र भारतीय संघाला हॉटेलमधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून संघाचा आज सराव देखील होऊ शकलेला नाही. कोरोनाची लागण झालेल्या प्रशिक्षकांच्या संपर्कात भारतीय खेळाडू आले होते. त्यामुळे करोना पसरण्याची भिती आहे. त्यामुळे खेळाडूंना रुममध्येच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे आणि यापुढे काय करायचे, याबाबतची खेळाडूंची मत जाणून घ्यायचा बीसीसीआयने यावेळी प्रयत्न केला आहे.

आयपीएल स्पर्धा देखील अवघ्या काही दिवसांवर आली असून भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यास या स्पर्धेवर विपरीत परिणाम होईल. एप्रिल अखेर कोरोनाच्या संसर्गामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती. त्याने बीसीसीआयचे मोठे नुकसान झाले. आता संभावित धोका व नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. बीसीसीआयला खेळाडूंच्या आरोग्याची चिंता सतावत आहे. त्यामुळे, खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी हा सामना रद्दही केला जाऊ शकतो, असे संकेत आता मिळत आहेत. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट मंडळ याबाबत नेमका कोणात निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!