Share

मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस

Published On: 

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांच्यागुन्हे शाखेने आता लूक आऊट नोटीस जारी केली आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. पुण्यात देखील राणेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता आर्थिक देवाण-घेवाणी वरून नीलम राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात एका खासगी कंपनीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही नोटीस जारी केली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) या कंपनीकडून नितेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुक आउट नोटीस पाठवली गेली आहे. याबाबत एक पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील प्राप्त झालेलं आहे. दरम्यान, आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआउट नोटीस जारी केली गेली आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे व नियमाप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आली होती अशी माहिती पुणे गुन्हे शाखेच्या आयुक्तांनी म्हटलं आहे.

लूक आऊट नोटीस म्हणजे नेमकं काय?

लूक आऊट सर्क्युलर (LOC) किंवा लूक आऊट नोटीस सर्क्युलर पत्र आहे. लूक आऊट नोटीस ही फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी देखील काढण्यात येते. बऱ्याच वेळा असं होत की आरोपी सीमेवर किंवा मग विमानतळावर पकडले जातात. कारण त्या आरोपींविरोधात काढलेली लूक आऊट नोटीस ही त्या त्या देशातील अधिकाऱ्यांकडे असते.

लुक आऊट नोटीसचा वापर आंतरराष्ट्रीय सीमेवर इमिग्रेशन तपासणीसाठी केला जाऊ शकतो. उदा. आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा सागरी भाग, बंदर. लूक आउट नोटीस जारी करणाऱ्या एजन्सीच्या विनंतीवरून इमिग्रेशन अधिकारी आरोपी व्यक्तीला ताब्यात घेऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!