Share

मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतासह जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. २०२० सह २०२१ च्या सुरुवातीला देखील कोरोना रोगाने देशात थैमान घातल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा लागला आहे. तर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम असून सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असं आवाहन राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन करत आहे. यंदाच्या वर्षी देखील कोरोनाचे सावट असून मुंबई महापालिकेने देखील गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे.

दरम्यान, मुंबईत कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लावण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांनी यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. यामुळे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही. अशात गणेशोत्सवासाठी बाहेर पडणाऱ्यांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुका आणि आगमन सोहळ्याला देखील परवानगी नाही. त्यामुळे यंदाही साध्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जाणार असून अनेक मोठी गणेश मंडळं ऑनलाइन दर्शन घेण्याचे नियोजन करणार आहेत.

सार्वजनिक मंडळांना आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशमूर्तीच्या प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाइन, केबल नेटवर्क, फेसबुक, समाजमाध्यमे यांद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असाही नियम घालण्यात आला आहे.

करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही संसर्गाचे सावट आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना अनेक नियम पाळावे लागणार आहेत. गेल्या वर्षी पालिकेने सार्वजनिक मंडळांना जे नियम घातले होते ते सर्व नियम यावर्षीही लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही प्रशासनाने नव्याने नियमावली जाहीर केली आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरी गणेशमूर्ती आणणाऱ्यांकरिता ही नियमावली बंधनकारक असणार आहे. घरगुती गणेशमूर्ती दोन फुटांपेक्षा, तर सार्वजनिक उत्सवातील मूर्ती चार फुटांपेक्षा उंच नसावी हा नियम कायम ठेवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!