Share

पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भारतासह जगभरात कोरोना रोगाने थैमान घातले आहे. २०२० सह २०२१ च्या सुरुवातीला देखील कोरोना रोगाने देशात थैमान घातल्याने हजारो लोकांना प्राण गमवावा लागला. पुण्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला होता. आता पुण्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली असून निर्बंधांमध्ये देखील सूट देण्यात आली आहे. अशातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कडक नियम लावले जाण्याची शक्यता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली होती.

पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध असून देश-विदेशातून भव्य सोहळा पाहण्यासाठी लोक येत असतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा उत्सव पुण्यात साजरा करण्यात येत असून सार्वजनिक गणेशोत्सवाला आता सव्वाशे (१२५) हुन अधिक वर्षांची परंपरा आहे. मात्र, यंदा देखील अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जावा अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. अशातच आज सकाळपासूनच पुण्यात पुन्हा जमावबंदी लागू होणार असल्याची चर्चा सुरु होती.

आता गणेशोत्सव काळात पुण्यात संचारबंदी किंवा जमावबंदी नसेल, असं पुणे शहर पोलिस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी सांगितलं आहे. मागील वर्षी होती तिच आचारसंहिता यंदाही पुण्यात लागू असेल असं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  तर, काही ज्वलनशील पदार्थांच्या बाबत हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण  डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले आहे. राज्य सरकारच्या नियमावली नुसार पूर्वीप्रमाणे अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन आहे.

गणेश मंडळांनी सहकार्य करण्याचं आवाहनही पोलिसांनी केलंय. दरम्यान, गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे ७ हजार पोलीस कर्मचारी, ७०० अधिकारी, शीघ्र कृतीदल, गुन्हे शाखेची पथके, श्वान पथक, छेडछाड विरोधी पथक, होमगार्ड, फिरते नियंत्रण कक्ष, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांचा समावेश यामध्ये असणार आहे. गणेशोत्सवात गुन्हे घडू नयेत याकरिता वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात येईल. महत्त्वाच्या ठिकाणावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहेत. उत्सव कालावधीतील चित्रीकरण संग्रहित ठेवले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!