मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळ मुक्त करत त्यांचे नाव वगळण्यात आले आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला.
यानंतर छगन भुजबळ यांनी ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. ‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए…ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…’ अशी शायरी करत भुजबळ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. माझ्यावर खोटे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण माझा न्यायदेवतेवर विश्वास होता, असं देखील भुजबळ म्हणाले.
‘तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे… त्यांनी कितीही कटकारस्थान केलं तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावरटं विघ्न दूर झालं… पवारसाहेबांचे आभार…. जयंतराव-अजितदादांचे आभार… मला मंत्रिमंडळात घेतलं, उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार,’ असं म्हणत भुजबळांनी सर्वांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता; ‘आगे आगे देखो होता है क्या?’
- शिवसेनेत गृहकलह ? भावना गवळींकडून जीवाला धोका; शिवसेना नेत्यानेच केला गंभीर आरोप
- ‘अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर…’ ; किरीट सोमय्यांचे खुले आव्हान
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- ‘..मग नारायण राणे महायेडे होते का?’, गुलाबराव पाटलांचा नितेश राणेंना खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

