Share

औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना

Published On: 

औरंगाबाद : कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला सण म्हणजे गणपती उत्सव. यंदा एसटी महामंडळाद्वारे २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद एसटी विभागातूनही ७५ बसेस मुंबईला रवाना झाल्या आहेत.

मुंबई पालघरमधील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सोडण्यात आल्या. चाकरमान्यांना थेट त्यांच्या घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु झाले होते. दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कोकणात जाणाऱ्या या बसेस मुंबईतून सुटत असल्या तरी राज्यातील विविध विभागातून त्याआधीच बसेस मुंबईत दाखल होत असतात. त्यानुसार औरंगाबाद विभागातून ५ व ६ सप्टेंबर रोजी ७५ बसेस विशेष कोकणात जाण्यासाठी रवाना झाल्या आहेत. मराठवाड्यात गणपती उत्सवादरम्यान महालक्ष्मींचे आगमन होते. त्यामुळे मराठवाड्यातून इतर भागात जाण्यासाठी जास्तीच्या बसेस सोडण्याची गरज नसल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!