मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांचे सांत्वन करण्यासाठी एक खास पत्र लिहले आहे. कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या घरी वैयक्तिक पत्र पाठवून धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांप्रती दाखवलेल्या आपुलकीचं पक्षामध्ये आणि पदाधिकाऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.
काय आहे ते खास पत्र :
आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे.
परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा
आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबीय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो
अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे सांत्वन करण्यासाठी लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, मित्रानो तुम्हा सर्वांची खूप जास्त आठवण येईल’; शालूची भावूक पोस्ट
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

