मुंबई – देशात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्या म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती, जी मुदत 26 मे रोजी पूर्ण होणार आहे. आतापर्यंत या कंपन्यांनी सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन केलेलं नाही. त्यामुळे आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्वीटर हे तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतात 2 दिवसांनंतर बंद होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नवीन नियमावली लागू करत असल्याची घोषणा २५ फेब्रुवारी २०२१ ला केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद तसंच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती.या नियमांच्या पूर्ततेसाठी सोशल मीडिया कंपन्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता.
हा कालावधी २६ मे २०२१ रोजी संपत आहे. तोपर्यंत कंपन्यांनी सरकारच्या नियमावलीप्रमाणे रचनात्मक बदल केले नाहीत, तर त्या कारवाईस पात्र ठरू शकतात. सोशल मीडिया तसेच डजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर कुणाचेही नियंत्रण नाही. याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने यावर नियमावली लागू करत असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान,एका बाजूला ही सर्व चर्चा सुरु असताना शालू अर्थात राजेश्वरी खरात हिची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. राजेश्वरी ही देखील समाज माध्यमांवर खूप सक्रीय असते. तिच्या एका एका व्हिडीओ आणि फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.मात्र आता ही समाजमाध्यमे बंद होणार असल्याच्या चर्चांनी ती आता भावूक झाली आहे.
याबाबतच्या भावना तिने फेसबुक पोस्टच्या माध्यामतून व्यक्त केल्या आहेत. राजेश्वरी या पोस्टमध्ये म्हणाली, उद्यापासून फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्वीटर कदाचित भारतामध्ये बंद होतील म्हणजेच बंद होतील, असे समजले आहे. असे झालेच तर मित्रानो तुम्हा सर्वांची खूप खूप जास्त आठवण येईल मला.

पुढे ती म्हणाली, आपण सर्वांनी दिलेले प्रेम हे अमूल्य आहे. सरकार जे काही निर्णय घेत आहे तो काही कारणाने बरोबर आहे, म्हणुन आपण कोणताही एखाद्या नवीन भारतीय (Made In India) ऍप वर कनेक्ट होऊया. आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, तेव्हा let’s wait and watch असे तिने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

