लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात थैमान घातेलेल असताना आता तिसरी लाट येणाच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. तिसरी लाट आता लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आत तयारी करण्यात येत आहे. शासन, प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने व आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमातून आपण दुसऱ्या कोरोना लाटेवर यशस्वी विजय मिळवत आहोत. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ञांची मते असल्याने तो धोका ओळखून आपण आजपासून कामाला लागू. देव करो तिसरी लाट येऊ नये. आलीच तर आपली यंत्रणा सज्ज राहावी, यासाठी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच लहान मुलांसाठी आयसीयूची व्यवस्था सुरू करण्यात येणार असल्याचे युवानेते अरविंद निलंगेकर यांनी सांगितले.
निलंगा उपजिल्हा रुग्णालयात आक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या १० बेडच्या आयसीयू वॉर्डाचे लोकार्पण व तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आयोजित बालरोगतज्ञ, प्रायमरी स्कूल यांच्या बैठकीत ते बोलत होते. निलंगेकर म्हणाले, आपला तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी वेळ मिळाला आहे. आपण सर्वांनी आपापल्या कल्पना सुचवून लहान मुलांमध्ये येणारी लाट कशी रोखता येईल, यासाठी प्रयत्न करु. आपण कामानिमित्त बाहेर असतो तर लहान मुले घरी असतात तर अशावेळेस आपणच कोरोनाचे विषाणू घेऊन जात नाहीयेत ना याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही टे या वेळी म्हणाले.
यावेळी प्रायमरी स्कूलचे प्रतिनिधी मल्लिकार्जुन कोळे यांनी शहरातील एकूण १८ शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉटसअप नंबर उपलब्ध आहेत. त्यांना आम्ही वेळोवेळी जनजागृती करु. त्याचबरोबर मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी गोळ्या देता येतील का पाहावे, अशी सुचना केली तर बालरोगतज्ञ प्रतिनिधी म्हणून डॉ. बिराजदार यांनी शहरातील सर्व बालरोग तज्ञ डॉक्टर प्रशासनाने दिलेली जबाबदारी स्विकारु, असे त्यांनी सांगितले. शल्य चिकित्सक डॉ देशमुख यांनी शहरातील सर्व बालरोग तज्ञांनी कोविड केअर सेंटर चालू करण्यासाठी तात्काळ परवानगी मागावी व आपल्या सूचना कळवाव्या, असे आवाहन केले.
महत्वाच्या बातम्या
- बंगाल हिंसाचार प्रकरण; सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जी सरकारला फटकारले
- कोरोना रुग्णांची माहिती भाजपकडे ‘लिक’ ? राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप
- ‘इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत’, शिवसेनेचा आरोप
- ऐ चुप्प… लाईव्ह डिबेट शोमध्ये मराठमोळे डॉ. लेले बाबा रामदेव यांच्यावर बरसले
- म्युकरमायकोसीस वाढतोय ; इंजेक्शनसाठी राज्य सरकारने काढले ग्लोबल टेंडर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
