मुंबई : आयपीएल स्पर्धा स्थगितीनंतर भारतीय क्रिकेट रसिकांना उत्सुकता लागली आहे ती जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची. आगामी १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड दरम्यान हा सामना खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कसुन तयारीला लागले आहे.
या अंतिम सामन्यापुर्वी न्युझीलंडचा संघ हा इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्युझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट खेळु शकला नव्हता. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने संघात पुनरागमन केले आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४ तर दुसऱ्या डावात १ गडी बाद केला होता. भारताविरुद्धच्या सामन्याआधी त्याने अंतिम सामन्यात आपण चांगल्या स्थितीत असु असा विश्वास व्यक्त केला आहे. या सामन्यासाठी खुप उत्साही असल्याचे त्याने सांगितले.
२०१९ पासुन सुरु असलेली जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा अंतिम टप्पयात पोहोचली आहे. न्युझीलंड आणि भारत दोन्ही संघ इंग्लंडमध्ये पोहोचले आहेत .न्युझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. तर भारतीय संघ आपपासात सराव सामना खेळत आहे. दोन्ही संघ अंतिम लढतीसाठी सज्ज आहेत
महत्वाच्या बातम्या
- श्रीलंका दौऱ्यात धवनला कर्णधारपद दिल्याने ‘हा’ माजी क्रिकेटपटू नाराज
- ‘खतरों के खिलाडीमध्ये जा’; फोटो पाहून चाहत्यांचा रसिकाला सल्ला
- ‘वारकऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार झाला असता तर..’, शासनाच्या निर्णयावरून खडसेंची खंत
- कोहली करणार बॉलिंग? ; बीसीसीआयने प्रॅक्टिसचा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर चर्चा
- अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

