मुंबई : बॉलीवूडमध्ये बहुतेक हे पहिल्यांदाच घडत आहे की खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमारच्या चित्रपटाची प्रेक्षकांना वाट बघावी लागत आहे. कारण अक्षय कुमार हा त्याच्या जलद चित्रीकरणासाठी ओळखला जातो. अगदी कमी वेळेत तो चित्रपटाचे चित्रीकरण संपवण्यासाठी जाणला जातो. मात्र मागील वर्षी उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा आगामी चित्रपट ‘सूर्यवंशी’ अद्याप प्रदर्शित झालेला नाही. मात्र आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजत आहे.
https://www.instagram.com/p/B8s2H8Hngze/?utm_source=ig_embed&ig_rid=310d35d2-763d-4496-8247-72789e5affcf
‘सूर्यवंशी’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक किंवा अभिनेत्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलर पाहाताचा चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह आणि अजय देवगण देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटात अक्षय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित होणार होता. याआधी देखील या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चर्चा सुरु होती. यावर अक्षयने खुद्द या चर्चेचे खंडण करत ही केवळ अफवा असल्याचे सांगितले होते. तसेच वेळ आली की प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात येईल असेही तो म्हणाला होता.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण


