🕒 1 min read
मुंबई : झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका होती. या मालिकेतील अभिनेत्री ‘शनया’ अर्थात रसिका सुनीलने तिच्या अभिनयाने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतून ती घरा-घरात पोहचली. रसिका सोशल मीडीयावर प्रचंड सक्रीय असते. ती अभिनयासोबतच उत्तम गाणी देखील गाते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकताच रसिकाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुला खतरों के खिलाडी या कार्यक्रमात पाहायला आवडेल असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. हा फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडत आहे.
https://www.instagram.com/p/CP-j2RirwT6/?utm_source=ig_web_copy_link
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत अभिजीत खांडकेकर, अनिता दाते यांच्या मुख्य भूमिका होती. नवरा बायकोच्या गोड संसारात जेव्हा नवऱ्यावर हक्क सांगणारी एखादी तिसरी व्यक्ती येते तेव्हा हक्काची बायको तिला नवऱ्यापासून दूर ढकलत तिचा तिरस्कार करते ? की संसारातील एक आव्हान म्हणून तिचा स्वीकार करते ? याची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत होते.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, नव्या रुग्णांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक
- ‘माझी वारी-माझी जबाबदारी यानूसार ज्ञानोबा-तुकोबा पालखी पायी वारी करणार’, विश्व वारकरी सेनेचा इशारा
- जी-७ शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा नारा
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
