Share

श्रीलंका दौऱ्यात धवनला कर्णधारपद दिल्याने ‘हा’ माजी क्रिकेटपटू नाराज

Published On: 

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आल्याने माजी क्रिकेटपटु डोड्डा गणेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी धवन ऐवजी मनीष पांडेकडे संघाचे नेतृत्व द्यायला हवे होते असे मत व्यक्त केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच भुवनेश्वर कुमारला उपकर्णधारपद देण्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की,’श्रीलंका दौऱ्यात जर अनुभवी खेळाडुला कर्णधारपद देण्याचे नियोजन होते तर मनिष पांडेला कर्णधारपद द्यायला हवे होते. तो संघातील सर्व खेळााडुंना ओळकतो. आणि जर धवन हा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला असता तर कुणाला कर्णधारपद दिले असते?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला.

शिखर धवन हा यापुर्वी दोन वेळा भारतीय संघाचा उपकर्णधार राहिलेला आहे. मात्र त्याला नेतृत्वाचा अनुभव नाहीये. धवन २०१८ पासुन भारतीय कसोटी संघातुन बाहेर आहे. डोड्डा यांनी कर्णधारपदासाठी मनिष पांडेचे नाव पुढे केले आहे. पण भुवनेश्वरला मनीष पांडेपेक्षा जास्त अनुभव आहे. कारण भूवनेश्वरने २०१२ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तर मनीष पांडेने २०१५ साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!