मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने शनिवारी रात्री मुंबईच्या समुद्रात सुरु असणाऱ्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने याठिकाणाहून अंमली पदार्थांचा साठाही जप्त केला होता.
दरम्यान, आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. या सुनावणी दरम्यान आर्यनच्या कोठडीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्यनला आणखीन एक दिवस कोठडीत राहावे लागणार असल्याची शक्यता आहे. एनसीबीने आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं होत. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.
काल रात्री एनसीबीने आर्यनशह आठ जणांची कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान, आर्यन गेल्या चार वर्षांपासून ड्रग्जचं सेवन करत असल्याचीही माहिती समोर आली. त्याने केवळ भारतातच नाही तर विदेशातही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. तसेच आर्यनचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

