मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज शाळेच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथील सायन भागातील डी एस स्कूलमध्ये पोहचल्या. आज शाळेचा पहिलाच दिवस आहे, अभ्यास नको गप्पा मारा, असा संवाद त्यांनी विद्यार्थ्यांशी यावेळी साधला.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून शाळेत येता आले नाही, तब्बल दीड वर्षानंतर आज शाळेची घंटा वाजली. या दीड वर्षानंतर शाळेत येऊन कसे वाटते असे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी विचारले. शिक्षकांनी लगेच विद्यार्थ्यांवर अभ्यास न लादता विद्यार्थ्यांशी गप्पा माराव्यात, त्यांच्या मनावरील ताण हलका करावा, परिस्थितीशी एकरूप होण्यासाठी त्यांना काही दिवस द्यावेत, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांना यावेळी केल्या.
कोरोना नियमांचा अवलंब करून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे कडक पालन करण्याच्या सूचना सर्व शाळांना देण्यात आल्या आहेत. सर्व विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक असून शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांचे तापमान मोजन्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक दिवसांपासून शाळा बंद असल्याने शिक्षकांसाठीही आजचा दिवस खास होता. शिक्षकांनी शाळांतील सजावट केली तसेच विद्यार्थ्यांची आरतीही ओवाळण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये शिवसेना संपविण्याचे काम केले’, सुभाष साबणेंचा आरोप
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

