छत्तीसगड: उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने काल आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडले. याठिकाणी प्रशासनाने 144 कलम लागू केलं आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांना येथे जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरूनच आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.
लोकांना लखीमपूर खेरीला जाण्यापासून का रोखले जात आहे? लखीमपूर खेरीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे मग लखनौमध्ये कोणाला उतरण्याची परवानगी का नाही? यूपीमध्ये यापुढे लोकांना अधिकार नाहीत का? यूपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची आवश्यकता आहे काय? असा संतप्त सवाल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला आहे.
Why are people being stopped from visiting Lakhimpur Kheri? Section 144 has been imposed in Lakhimpur Kheri then why isn't one allowed to land in Lucknow? Do people no longer have rights in UP? Does one need a visa to visit UP?: Chhattisgarh CM Bhupesh Baghel https://t.co/9HL4jC1SgS pic.twitter.com/MDIJmgyJ11
— ANI (@ANI) October 4, 2021
या घटनेवरून आता देशभर संताप व्यक्त केला जात आहे. याठिकाणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. यावरूनही कॉंग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतांवर अंतिम संस्कार करण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदीजी तुमचे सरकार आणि मंत्री शेतकरी अनुकूल आहेत की तालिबानी?’
- ‘..ही तानाशाही आहे काय?’ ‘त्या’ घटनेवरून कॉंग्रेसचा संताप
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- माझ्या मुलीचा पराभव करणारा ‘गद्दार’ कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यावर समजलं- एकनाथ खडसे
- लखीमपुर दुर्घटनेवर शरद पवार संतापले, म्हणाले..


