Share

‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो’

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई –राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात एका छताखाली आणले. बापूच्या एका हाकेवर देश एकत्र होत असे. त्यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावला. गांधी विचाराने देशाला नाहीतर जगाला दिशा दिली. पण ज्या विचाराने महात्मा गांधी यांची हत्या केली तेच लोक आज गांधी जयंतीनिमित्त गांधी विचार सामान्यापर्यंत पोहचवत आहेत, हीच गांधी नावाची ताकद आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधी यांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वातंत्र्याचा लढा दिला. भारताला ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले. या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही ते आज देशातील लोकशाही व्यवस्था संपुष्टात आणत आहे. ज्या विचाराच्या लोकांनी महात्मा गांधी यांची हत्या केली तेच लोक आज गांधी विविध कार्यक्रम घेऊन गांधी विचार सामन्यापर्यंत पोहचवणार असे सांगत आहेत. त्या लोकांकडे सांगण्यासारखे, आदर्श घेण्यासारखे काहीच नाही. म्हणून ते कधी सरदार पटेल तर कधी महात्मा गांधी यांचा आश्रय घेतात.

पटोले म्हणाले, देशातील जनता या लोकांचं ढोंग ओळखून आहे. त्यांनी गांधी प्रेमाचा कितीही आव आणला तरी त्यांचे खरे रूप लोकांना माहित आहे. गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो ही बापूची व त्यांच्या विचाराची ताकद आहे. पण बापूने घालून दिलेल्या मार्गाने वाटचाल करणे त्यांना जमणारे नाही.

माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला परंतु आज भाजपाच्या राजवटीत चुकीच्या धोरणामुळे जवानांना सीमेवर बलिदान द्यावे लागत आहे. चीनी आक्रमण थोपवण्यात मोदी सरकार फेल ठरले आहे तर शेतक-याला देशोधडीला लावण्याचे काम केले जात आहे असं देखील पटोले म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!