नाशिक – देशात अनेक संस्थांचे खाजगीकरण होताना दिसत आहे. जे ६० – ७० वर्षात तयार करण्यात आले ते विकण्याचे काम मोदीसरकार करत आहे. त्यामुळे ही लढाई संपलेली नाही.आता सरकारमध्ये असलो तरी ही लढाई २०२४ पर्यंत आपल्याला लढायची आहे. आणि त्या निवडणुकीत जास्त जागा जिंकून आणू त्यावेळी ही लढाई संपेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षण असेल किंवा ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळसाहेबांनी अभ्यास करून मंत्रीमंडळात मांडणी केली आहे. आज ओबीसी आरक्षणासाठी ते लढा देत आहेत. इम्पिरिकल डेटाची मागणी करुनही केंद्रसरकार टाळाटाळ करत आहे यावरुन हे सरकार ओबीसीविरोधात किती आहे हे लक्षात येते असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. ईडीचा गैरवापर करण्यात आला त्याचं उदाहरण भुजबळसाहेब आहेत. भुजबळसाहेबांना महाराष्ट्र सदन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला मात्र कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्त केले आहे असेही जयंत पाटील म्हणाले.या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची भूमिका कळावी यादृष्टीने ही परिवार संवाद यात्रा असल्याची माहिती यावेळी जयंत पाटील यांनी दिली.पक्षाची प्रगती करायची असेल तर २८८ मतदारसंघापर्यत गेले पाहिजे. या मतदारसंघात निवडणूक लढवली की नाही यापेक्षा कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे माझं काम आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
पक्षाचे मेळावे घेऊन प्रबोधन करणारी टिम तयार करण्यात आली आहे. ती टिम मार्गदर्शन करेल. बुथ कमिट्यांची रचना तळागाळात पोचवण्याची गरज आहे.पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा या आमदारकीचा पाया आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश प्राप्त करुया असे आवाहन ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.प्रत्येक ठिकाणी आपली शक्ती उभी करायची आहे. आपण स्वतःची ताकद उभी करा ज्यामुळे आपण आपल्या ताकदीवर निवडून येऊ असा विश्वास मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.इगतपुरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असे मार्गदर्शनही मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘देशमुख व परमबीरपैकी एकाला ‘वर्षा’वर तर दुसऱ्याला ‘मातोश्री’वर लपवलेय!’, सोमय्यांचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

