Share

‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही

Published On: 

नांदेड: राज्यात कोकणनंतर आता मराठवाड्यावर अवकाळी संकट कोसळले आहे. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.अतिवृष्टीमुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत.

तमलुर येथे नुकसानीची पाहणी केली करताना फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी फडणवीसांकडे सरकार दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करण्याचं आवाहन केलं. तर काळजी करू नका, सारे मिळून सोबत लढू आणि आपल्या बळीराजाला मदत मिळवून देऊ. अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यात पिंपळगाव (महादेव) येथे सुदर्शन झुंझारे बैलगाडीसह उमा नदीत वाहून गेले. फडणवीस आणि दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. या कुटुंबाला शासनाने तत्काळ मदत करावी अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. तर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेही आता परभणी येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!