मुंबई : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यातील न्युझीलंडविरुद्धच्या डब्ल्युटीसी सामन्यात रिषभ पंत हा भारतीय संघाचा सदस्य होता. डब्ल्युटीसी सामन्यानंतर भारतीय संघ २० दिवसाच्या सुटीवर गेला होता. रिषभ पंत यावेळी युरो कप स्पर्धेचा आनंद घेत असल्याचे आढळले होते.
मात्र यादरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. रिषभ पंतला कोरोनाची लागण ही एक आठवड्यापुर्वी झाली होती. येत्या १८ जुलै रविवारी पंतचा विलगीकरणाचा कालावधी पुर्ण होणार आहे. त्यामुळे तो काही दिवसातच भारतीय संघासोबत सराव करु शकतो. महत्वाची बाब म्हणजे रिषभ पंतने काही दिवसापुर्वी कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट
- …अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरु करु, खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
- ‘महानायक अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची ‘प्रतिक्षा” ; बंगल्यासमोर ‘मनसे’चं बॅनर
- आयपीएलपुर्वी दिल्ली संघासाठी चांगली बातमी! ‘तो’ परत येतोय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

