Share

आमिर-किरणचा एकत्र डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी ३ जुलै रोजी घटस्फोटाच्या घोषणेने सर्वांना चकित केले. १५ वर्षाच्या संसारानंतर अमिरने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेऊन देखील ते एकत्र असल्याचे पाहायला मिळते. घटस्फोटानंतर देखील ते अनेकदा एकत्र पाहायला मिळले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या एकत्र डान्स करताना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/CRUApdVHG7c/?utm_source=ig_web_copy_link

आमिर आणि त्याची संपूर्ण टीम ही सध्या लडाखच्या वाखा या गावात त्यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’चे चित्रीकरण करत आहेत. या दरम्यान आमिर आणि किरणने लडाखच्या लोकांचा पारंपारिक कपडे सुल्मा आणि कोस परिधान करत त्यांच्या लोकनृत्यावर डान्स केला असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आमिर आणि किरण लोकप्रिय लडाखी नृत्य ‘गोम्बा सुमशाक’ करताना दिसत आहेत. हे व्हिडीओ आमिरच्या फॅन क्लबने शेअर केले आहेत.

https://www.instagram.com/p/CRUAPeagJEp/?utm_source=ig_web_copy_link

त्यानंतर आमिरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आमिर लहान मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. ‘3 इडियट्स’ या चित्रपटातील ‘ऑल इज वेल’ या गाण्यावर ते सगळे डान्स करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये सगळे धम्माल करत असल्याचेही दिसत आहेत. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा यंदाच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात करीना कपूर आणि अभिनेता आमीर खान मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!