मुंबई : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने स्पर्धा अर्ध्यातच स्थगित केली. यानंतर काही दिवसातच बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धेचे उर्वरीत सामने हे युएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात खेळवण्याचे ठरवले.
स्पर्धेपुर्वी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्ली संघाचा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर हा पुनरागमनासाठी सज्ज आहे. आयपीएल स्पर्धेपुर्वी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याने आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली होती. यादरम्यान तो तीन महिने क्रिकेटपासुन दुर होता. तसेच त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/CQ-30a_BUSe/?utm_source=ig_embed&ig_rid=1d03744f-1a18-4bf3-aa32-ae22fc59dce7
मात्र श्रेयस अय्यरने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट करत फलंदाजीला सुरुवात करत असल्याची माहिती दिली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने इन्स्टाग्राम या सोशल मीडीयावर यासंबधी पोस्ट करुन माहिती दिली. यादरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयसच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपीटल्सचे नेतृत्व भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे सोपवण्यात आले होते. मात्र श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे नेतृत्व पुन्हा एकदा त्याच्याकडे देण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- चिमुकल्या चाहत्याने फोडला टीव्ही; सोनू म्हणतो, ‘आता नवीन टीव्ही द्यावा लागेल’
- पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पटकावला पहिला क्रमांक
- टीम इंडियाला भटकंती पडली महागात ; इंग्लंडविरुद्धची मालिका धोक्यात?
- इंग्लंडच्या मॅटने केली वॉर्नच्या ‘त्या’ जादुई चेंडुची पुनरावृत्ती
- सर्व खेळाडूंना एकजूटीने आणि मानसिक स्थितीने सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न असेल : धवन


