🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत नंतर आता BMC बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. BMC अमिताभ बच्चन यांच्या घराची भिंत तोडण्याच्या तयारीत आहेत. अमिताभ यांच्या घरासमोर असलेल्या या रस्त्यावर बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात ट्राफिक पाहायला मिळतं. त्यामुळे BMC ने रस्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या याच बंगल्याच्या भिंतीवरून नवीन वाद सुरु झाला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर काही बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर लिहिले आहे की, महानायक आहात, जरा मनाचा मोठेपणा दाखवा, अशा आशयाच हे बॅनर त्यांच्या बंगल्या बाहेर लावण्यात आलं आहे.
2017 मध्ये अमिताभ बच्चन यांना BMC ने नोटीस बजावली होती. पण त्या नोटीसला बिग बींनी कडून कोणतही उत्तर मिळलं नाही. अमिताभ यांनी बीएमसीकडून नोटीस मिळाल्यानंतर न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं यावर आपला निर्णय देत हे काम थांबवण्यास सांगितलं होतं.

कॉलेज, शाळा, हॉस्पिटल असलेल्या या मार्गावर अमिताभ यांच्या ‘प्रतिक्षा’ बंगल्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे आम्हाला अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची प्रतिक्षा आहे, अशा आशयाचं बॅनर मनसेकडून लावण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘टीममधील तरुण खेळाडूंवर दबाव टाकत आहेत’ ; दिग्ग्जाचा मोठा दावा
- काउंटी स्पर्धेत अश्विनचा बळींचा सिक्सर, सरे संघाकडून खेळताना केली कामगीरी
- मोठी बातमी! भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण?
- अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव, मालिकाही गमावली
- कार्तिकच्या ‘त्या’ वक्तव्यावर पाकिस्तानी क्रिकेट रसिक खुश!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
