Share

ओबीसी आरक्षणप्रश्नी भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुप्रीम कोर्टाने ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे हे आरक्षण पूर्ववत करण्यासाठी, इम्पेरिकल डाटा मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. त्यांनतर आज भुजबळ यांनी थेट ओबीसी आरक्षण प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे.

भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते. भुजबळांचं निवासस्थान रामटेक ते सागर बंगला हे काही पावलांचं अंतर आहे. त्यामुळे आज सकाळीच छगन आणि समीर भुजबळ दोघेही देवेंद्र फडणवीसांना भेटले. या नेत्यांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत चर्चा झाली.

दरम्यान, इम्पेरिकल डाटा केंद्राने द्यावा अशी मागणी राज्य सरकारची आहे. त्यासंदर्भात भुजबळ फडणवीसांना भेटले, तसंच सरकारला मदत करावी, अशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!