Share

WI vs BAN : वनडे मालिकेतून बाहेर पडणार शाकिब अल हसन; ‘हे’ आहे कारण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बांगलादेशचा कसोटी कर्णधार शाकिब अल हसन वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs BAN) वनडे मालिकेतून माघार घेऊ शकतो. बांगलादेशचा संघ पूर्ण दौऱ्यासाठी कॅरेबियन भूमीवर आहे, जिथे तो कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली असून शाकिबच्या नेतृत्वाखालील संघाला २-० असा पराभव पत्करावा लागला. उभय संघांमधील तीन सामन्यांची वनडे मालिका २ जुलैपासून सुरू होणार आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, ही एकदिवसीय मालिका आयसीसी सुपर लीगचा भाग नाही. या कारणास्तव हा शाकिब मालिका वगळण्याचा निर्णय घेत आहे. शाकिब अल हसन वनडेनंतर होणाऱ्या टी-२० मालिकेचा भाग असेल. त्याचवेळी वनडे मालिकेत त्याच्या जागी तैजुल इस्लामचा समावेश केला जाऊ शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी ही माहिती दिली.

”शाकिब बोर्डाशी अधिकृतपणे बोलला नाही, कदाचित आज किंवा उद्या त्याच्याशी बोलल्यानंतर मी हे समजू शकेन”, असे हसन यांनी सांगितले. गेल्या काळात बांगलादेशची कामगिरी खराब झाली आहे आणि त्यामुळे संघावर खूप दबाव आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमवावी लागली होती आणि आता येथेही पराभव पत्करावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!