Share

उशिरा का होईना पंकजा मुंडेंकडून ‘जादूच्या कांडी’चा वापर, फडणवीसांसाठी चिंतेचा विषय?

Published On: 

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षात सध्या देश पातळीवर सध्या दोनच नेते निर्णय घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह. तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांचा दबदबा आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांना पक्षाकडून त्यांना भरभरून मिळावे किंबहूना मुख्यमंत्रिपद द्यावे अशी अपेक्षा समर्थकांची होती. पण २०१४ साली त्यांच्याकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली. परंतू जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असे जाहीर करून पंकजा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान दिले. तेव्हापासून फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात भाजपमध्ये एक अप्रत्यक्ष वाद सुरू झाला.

त्यानंतर पंकजा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. २०१९ च्या निवडणुकीत परळीतील पराभव, विधान परिषदेत डावलणे असे प्रकार घडले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी देऊन त्यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर राज्यसभेवर पक्षातीलच ज्युनिअर पदाधिकाऱ्याला संधी देणे, मग प्रीतम मुंडे यांच्यासाठी मंत्रीपदाची अपेक्षा असतांना पुन्हा तोच प्रकार घडणे यामुळे पंकजा मुंडे पक्षावर नाराज होत्या. आधी रमेश कराड आणि नुकतीच केंद्रात मंत्रीपदाची संधी भागवत कराड यांना मिळाल्यामुळे सहाजिकच पंकजा नाराज झाल्या. मात्र, यावेळी त्यांनी आता गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे जादूची कांडी वापरायला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

मुंबईत कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपली खदखद व्यक्त केली. पण ती तात्पुरत्या स्वरुपात. यानंतर त्या पहिल्यापेक्षा जोमाने कामाला लागल्या आहेत. मतदारसंघात त्यांनी भेटीगाठी वाढवल्या. सोबतच पंकजांनी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी जवळीक निर्माण करायला सुरुवात केली आहे. गेल्याच आठवड्यात पंकजा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतली. सोबतीला राज्यातील भाजप नेते होते. मात्र, त्यानंतरही पंकजा यांनी वैयक्तिकपणे केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यांशी संवाद साधला.

ही गोष्ट साधारण असली तरी राजकीय वर्तुळात याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. कारण, फडणवीस यांच्यामुळेच पंकजा यांना अनेक मोठ्या जबाबदाऱ्यांपासून वंचित राहावे लागले असा आरोप नेहमीच होत आहे. यात किती तथ्य आहे हे जगजाहिर आहे. राज्याच्या राजकारणात फडणवीस गटाची चलती आहे. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी पंकजा यांनी आता जेष्ठ नेत्यांशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या गोटात सध्या चिंतेचा विषय ठरत आहे.

गडकरींपासून पंकजा मुंडे चार हात लांब
भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही फारसे सख्य नसल्याचे चित्र आहे. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र अशी म्हण आहे. परंतू पंकजा यांनी कधीच गडकरींच्या बाजूने गेल्या नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक असे की, २०१४ साली बीडच्या केज मतदारसंघातून संगिता ठोंबरे यांच्या उमेदवारीसाठी पंकजा यांनी विरोध केला होता. पण ठोंबरे यांनी नागपुरात जाऊन गडकरींकडून उमेदवारी मिळवली. मोदी लाटेत त्या निवडूनही आल्या. तेव्हापासूनच गडकरी आणि पंकजा यांच्यात सुसंवाद राहिला नाही.

पंकजा समर्थक दिल्लीला जाऊ लागल्याने घेतला निर्णय
तीन वर्षांपूर्वी भाजपाने विधानपरिषदेला रमेश कराड यांना संधी दिली. राज्यसभेला भागवत कराड यांना. नंतर मंत्रिपदही कराडांच्या गळ्यात पडले. या सर्व गोष्टी फडणवीसांच्या मार्फत थेट दिल्लीहून घडत असल्याचे पंकजा यांना माहित होतेच. पण पक्षातील ‘राज्य’ हातात ठेवण्याच्या मोहापायी पंकजा यांचेच नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी अखेर परळीहून थेट दिल्लीलाच जवळ करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!