मुंबई : देशात भाजपची लोकप्रियता कमी होत असून देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणातही ही बाब समोर आली आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या दहांमध्ये भाजपचा फक्त एक मुख्यमंत्री आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पहिल्या पाचमध्ये आहेत. ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या ११ मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिल्या स्थानावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे. योगींना या सर्व्हेत केवळ २९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही या यादीत समावेश आहे.
मोदींच्या लोकप्रियतेत घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरून कमी होऊन २४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ३८ टक्के, तर ऑगस्ट २०२० मध्ये ६६ टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. या महिन्यात केवळ २४ टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली


