Share

‘उद्धव ठाकरे लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरणार’, संजय राऊतांचा विश्वास

Published On: 

मुंबई : देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाच जणांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक आला आहे. ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या ११ मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. याबाबत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आनंदासह अभिमान व्यक्त केला आहे.

ते म्हणाले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनेकवेळा सर्वेक्षण झाले तेव्हा टॉप १० किंवा टॉप ५ मध्ये आले आहेत. काही काळापूर्वीही ते टॉप १० मध्ये आले होते. आता ते टॉप ५ मध्ये आले आहेत. आपल्या कार्यकुशलतेतून ते हळूहळू देशातील पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनतील’ या शब्दात राऊतांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘उद्धव ठाकरेंनी गेल्या दोन वर्षांत राज्याच्या विकासासाठी आणि जनतेसाठी मोठे काम केले आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल जगाने घेतली, सर्वोच्च न्यायालयानेही घेतली आहे. राजकीय विरोधक काहीही म्हणतील. पण, देशातील जबरदस्त नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंकडेच पाहिले जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशातील टॉप ५ मध्ये आल्याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच ते टॉप १ मध्ये जातील, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, देशातील सर्वाधिक लोकप्रिय ११ मुख्यमंत्र्यांच्या नावांच्या यादीत पहिल्या स्थानावर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसऱ्या क्रमांकावर असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जींना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे. योगींना या सर्व्हेत केवळ २९ टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही या यादीत समावेश आहे.

मोदींच्या लोकप्रियतेत घट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली आहे. एकाच वर्षात मोदींची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरून कमी होऊन २४ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. जानेवारी २०२१ मध्ये ३८ टक्के, तर ऑगस्ट २०२० मध्ये ६६ टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. या महिन्यात केवळ २४ टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. मात्र, गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या लोकप्रियतेत वाढ होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!